ऊसतोड कामगाराचा मुलगा उपमहापौर झाल्याचा मला मनस्वी आनंद
पंकजाताईंनी ट्विटरवर केशव घोळवे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले
7 Nov :- पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे मोरवाडीचे प्रतिनिधीत्व करणारे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र ,घोळवे यांना फक्त पाच महिन्यांसाठी ही संधी दिली आहे. पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपल्या निवडीनंतर घोळवे यांनी मुंबईत जाऊन भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडेंची भेट घेतली.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केशव घोळवे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, केशव यांचे अभिनंदन करताना, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपमहापौर झाला याचा मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, पुढील कार्यासाठी घोळवे यांना पंकजा मुंडेंकडून शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. त्यावेळी, खासदार प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या.
वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरू करा- मुख्यमंत्री
पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली. शुक्रवारी महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
वाचा :- पंकजाताईंना राष्ट्रवादीने दिला जोरदार दणका
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सव्वा अकरा वाजता अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत कदम यांनी माघार घेतली.
वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली
वाचा :- गंभीर इशारा! पुढील महामारीला तोंड देण्यासाठी रहा सज्ज- WHO
वाचा :- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; ‘या’ प्रकरणी गोस्वामींना अटक करु नये!