राजकारण

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर संधी; खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

आमदार म्हणून खडसे यांचं नाव निश्चित!

7 Nov :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलीये. राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांची निवड केली आहे तर यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे केलीये, याचा मला आनंद झालाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मी आभार मानतो, असं खडसे यांनी सांगितलंय.

वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरू करा- मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर 3 जणांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. यामध्ये गायक आनंद शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, साहित्यिक, प्रा. यशपाल भिंगे यांचीही नावं जवळपास निश्चित झालीये.

वाचा :- ‘या’ कारणामुळे शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरला विधानपरिषदेची उमेदवारी

वाचा :- पंकजाताईंना राष्ट्रवादीने दिला जोरदार दणका

वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली