‘या’ कारणामुळे शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरला विधानपरिषदेची उमेदवारी
संजय राऊत यांनी सांगितलं उमेदवारी देण्याचं कारण
7 Nov :- महाविकास आघाडीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सोपवण्यात आली असून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसनेही ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली असा दावा केला होता.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचं कारण सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी देण्याचं समर्थन करताना ते म्हणाले की, “उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे.उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी सडेतोड बोलणारी व्यक्ती, देश आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारी अभिनेत्री सभागृहात गेल्यास महाराष्ट्राला फायदाच होईल”. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली.
वाचा :- पंकजाताईंना राष्ट्रवादीने दिला जोरदार दणका
परिवहनमंत्री अनिल परब, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या तीन पक्षांच्या मंत्र्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे १२ नावांची यादी सादर केली. दरम्यान राज्य सरकारसोबत सतत होणारं शाब्दिक युद्ध पाहता राज्यपाल सहजासहजी यादी मंजूर करणार नाहीत असं बोललं जात आहे.
वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली
शिवसेना खासदार संजय राऊत यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राज्यपाल हे कोणताही राजकीय बखेडा निर्माण करणार नाहीत. राज्यपाल सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे, राज्यपालांचं आमच्यावरही प्रेम आहेत. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे. या प्रेमातूनच पुढील सगळा कारभार सुरळीत होईल”.
वाचा :- ‘या’ कारणामुळे 23 नोव्हेंबरपासून शाळेचे दरवाजे उघडण्याची शक्यता
भाजपामधून अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.
वाचा :- गंभीर इशारा! पुढील महामारीला तोंड देण्यासाठी रहा सज्ज- WHO
राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर
वाचा :- गंभीर इशारा! पुढील महामारीला तोंड देण्यासाठी रहा सज्ज- WHO
वाचा :- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; ‘या’ प्रकरणी गोस्वामींना अटक करु नये!