गंभीर इशारा! पुढील महामारीला तोंड देण्यासाठी रहा सज्ज- WHO
कोरोनाच्या दुसऱ्या लोटेला दुजोरा
6 Nov :- कोरोना महामारीमुळे सध्या संपुर्ण जगाचं अर्थचक्र थांबलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे आता जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाच्या दुसऱ्या लोटेला दुजोरा दिला आहे. तसेच पुढे येणाऱ्या जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही केले आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
विविध देशांनी त्यांच्या आरोग्यव्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्लाही WHO ने दिला आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक त्रिसूत्री सुचवली आहे. या त्रिसूत्रीमध्ये विज्ञान, आरोग्यविषयक योग्य उपाययोजना आणि संकटाविरुध्द लढण्यासाठीच्या एकतेचा समावेश आहे.
वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली
सध्या युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस तिथले कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून तिथे लॉकडाऊन जाहीर केलं आहे.
वाचा :- ‘या’ कारणामुळे 23 नोव्हेंबरपासून शाळेचे दरवाजे उघडण्याची शक्यता
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोरोना संसर्गावरील नियंत्रण हा चर्चेचा मुद्दा ठरला असला तरी प्रत्यक्ष प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेत आज नव्याने आढळणाऱ्या
वाचा :- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; ‘या’ प्रकरणी गोस्वामींना अटक करु नये!
वाचा :- दिवाळीआगोदर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मदतवाटप सुरु होणार