सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; ‘या’ प्रकरणी गोस्वामींना अटक करु नये!
राज्य सरकारला दणका!
6 Nov :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांना विधानसभेने हक्कभंगाची नोटीसही बजावली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. हक्कभंग प्रकरणात गोस्वामी यांना अटक करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून पोलिसांना बुधवारी अटक केली होती. पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा गोस्वामी न्यायायलात केला. भाजपचे अनेक नेते हे गोस्वामींवरील कारवाईवरुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला लक्ष्य करीत आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यावर आज सुनावणी होत आहे.
वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी विधानसभेने गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावरील सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर झाली. गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस बजावल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस सरन्यायाधीशांनी बजावली आहे.
वाचा :- ‘या’ कारणामुळे 23 नोव्हेंबरपासून शाळेचे दरवाजे उघडण्याची शक्यता
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांना गोस्वामी यांच्या वतीने बाजू मांडली. गोस्वामी यांच्यावर एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे त्यांना या प्रकरणात अटकेपासून संरक्षण द्यावे, असे साळवे यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत गोस्वामी यांना हक्कभंग प्रकरणात अटक करु नये, असे निर्देश सरन्यायाधीशांनी राज्य सरकारला दिले आहेत.
वाचा :- दिवाळीआगोदर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मदतवाटप सुरु होणार
दरम्यान, गोस्वामी यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे गोस्वामी यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
वाचा :- अभिनेत्री पूनम पांडेला गोवा पोलिसांनी केली अटक
वाचा :- उद्धव साहेबांनी, ‘किंचाळणाऱ्या बोक्याला थेट पिंजऱ्यात टाकल’
वाचा :- दिवाळी साजरी कारण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘विशेष’ आवाहन