यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली
नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला खावी लागणार तुरुंगाचीही हवा
6 Nov :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी ही फटाक्यांविना असणार आहे. दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी येणार आहे. फटाकेबंदीवरुन कॅबिनेटमध्ये जोरदार चर्चा झाली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट पोलिस कारवाई होऊन तुरुंगाचीही हवा खावी लागण्याची शक्यता आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
कोरोनाचं संकट पाहता राज्य सरकारने दिवाळी सण साजरा करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. मुंबईसह संपूर्ण महामुंबईसाठी दिवाळीत फटाके फोडण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबात भूमिका मांडली आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमावली जाहीर केली आहे.सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे.
वाचा :- ‘या’ कारणामुळे 23 नोव्हेंबरपासून शाळेचे दरवाजे उघडण्याची शक्यता
राज्य सरकारनं दिवाळीसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे
कोरोना संदर्भात असलेल्या SOP चे पालन करण्यात यावे
दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
वाचा :- दिवाळीआगोदर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मदतवाटप सुरु होणार
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.
यंदाच्या दिवाळीत मुंबई महापालिकेकडून फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके यंदा फोडता येणार नाहीत.
वाचा :- अभिनेत्री पूनम पांडेला गोवा पोलिसांनी केली अटक
महापालिकेनं सोसायटी आणि घराच्या परिसरात फटाके फोडावं असं सांगितलं आहे. तसंच नियमावलीचं उल्लंघन केल्यास पालिकेकडून पोलिसांच्या मदतीनं कारवाई होईल, असंही सांगण्यात आलं आहे.
वाचा :- उद्धव साहेबांनी, ‘किंचाळणाऱ्या बोक्याला थेट पिंजऱ्यात टाकल’
वाचा :- दिवाळी साजरी कारण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘विशेष’ आवाहन