महाराष्ट्र

‘या’ कारणामुळे 23 नोव्हेंबरपासून शाळेचे दरवाजे उघडण्याची शक्यता

शाळा करण्याची ठाकरे सरकार केली विनंती!

6 Nov :- करोना संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालंय अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. दरम्यान दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ तारखेपासून शाळा सुरु कऱण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र हा निर्णय नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असेल.अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

“मे महिन्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. कारण पुन्हा निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचं पुढील वर्षी प्रवेश घेताना नुकसान होईल.आम्ही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मंत्रीमंडळात यासंबंधी कल्पना दिली आहे. साधारणत ही परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होते. पण सध्या तशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे २३ तारखेपासून नववी, दहावी, अकरावी, बारावीच्या शाळा सुरु कराव्यात अशी विनंती केली आहे,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

वाचा :- दिवाळीआगोदर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मदतवाटप सुरु होणार

पुढे बोलताना त्यांनी अकरावी प्रवेशासंबंधीही माहिती दिली. “बैठकीनंतर मुख्यमंत्री, अशोक चव्हाण आणि मी असे सगळेजण चर्चेसाठी बसलो होतो. अकरावी प्रवेशाबाबत आज निर्णय होईल. येणाऱ्या काळात कदाचित आम्ही प्रवेश सुरु करु”.

वाचा :- अभिनेत्री पूनम पांडेला गोवा पोलिसांनी केली अटक

नव्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता आयोगाने प्रत्यक्ष महाविद्यालयांचे वर्ग भरवण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शिक्षणसंस्था सुरू करण्यासच आयोगाने परवानगी दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

वाचा :- उद्धव साहेबांनी, ‘किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल’

वाचा :- दिवाळी साजरी कारण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘विशेष’ आवाहन

वाचा :- दिवाळीनंतर ‘लावणी’ आणि ‘तमाशा’ सुरू करू- मुख्यमंत्री