बीड

बीडच्या ‘जागृत’ कलावंतांनी साजरा केला ‘मराठी रंगभूमी दिन’

कलेप्रती असणाऱ्या निस्वार्थ,श्रद्धेचं, निष्ठेचं दर्शनच घडून आले

5 Nov :- कोरोना विषाणूच्या महाकाय थैमानामुळे ठप्प झालेलं कलाविश्व पुन्हा एकदा सुरु होणार असल्याची सुखदायी माहिती राज्य सरकारने दिली.कोरोना विषाणूच्या प्रदुर्भवापासून दक्षता घेत राज्यात सिनेमागृहाची, नाट्यगृहाची दरवाजे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.तर दिवाळीनंतर लावणी, तमाशाला सुद्धा प्रारंभ करू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

ठाकरे सरकारने कलावंतांचा विचार करत घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच सर्व बाबी सुरळीत होऊन कलावंतांच्या आयुष्यातील अंधार आता दूर होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. काल अनेक ठिकाणी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.बीडमधील अनेक जेष्ठ रंगकर्मी झोपेत असतांना बीडच्याच काही जागृत कलावंतांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मराठी रंगभूमी दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.

वाचा :- राज्य सरकारची मोठी घोषणा; ऑनलाईन शाळांना सुट्टी जाहीर

बीडच्या काही कलावंतांनी सकाळी नाट्यगृह उघडून सराफ-सफाई करत गेल्या अनेक दिवसांपासून बंद असणाऱ्या नाट्यगृहातील रंगमंचावरील साचलेली धूळ झटकत व्यवस्थितरित्या स्वच्छ करून रंगदेवता नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार चढवत पूजन केले.

वाचा :- उद्धव साहेबांनी, ‘किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल’

कलावंतांनी नटराजाचे पूजन स्वतः न करता बीड यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिराची दिवसरात्र देखरेख करणारे तसेच आपल्या नौकरीला नौकरी न समजता ही सुद्धा रंगभूमीची सेवाच समजणारे नाट्यगृहाचे कर्तव्यदक्ष कर्मचारी दत्ता भाऊ आगवान यांना नटराजाच्या पूजनाचा मान देत याच्या हस्ते हे पूजन केले. बीड जिल्ह्यातील हुरहुन्नरी, जागृत कलावंतांच्या या कृतीतून कलेप्रती असणाऱ्या निस्वार्थ श्रद्धेचं, निष्ठेचं दर्शनच घडून आले.

वाचा :- दिवाळी साजरी कारण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘विशेष’ आवाहन

वाचा :- दिवाळीनंतर ‘लावणी’ आणि ‘तमाशा’ सुरू करू- मुख्यमंत्री