सिनेमा,मनोरंजन

अभिनेत्री पूनम पांडेला गोवा पोलिसांनी केली अटक

सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ शूट करण्याचा आरोप

5 Nov :- नेहमी वादात राहाणारी अभिनेत्री पूनम पांडेला गोवा पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. तिच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ शूट करण्याचा आरोप लावण्यात आला होता आणि तिच्या विरोधात गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला आघाडीने तक्रार दाखल केली होती.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

तक्रार दाखल झाल्यानंतर आज गोवा पोलिसांनी तिला अटक केली आहे. बुधवारी गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला आघाडीने अभिनेत्री पूनम पांडेविरूद्ध तक्रार दाखल केली होती.

वाचा :- उद्धव साहेबांनी, ‘किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल’

पूनम पांडेच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारी म्हटले आहे की, ती गोवाच्या चमोली धरणामध्ये खुलेआम अश्लील व्हिडिओ शूट करत होती. याशिवाय पूनम पांडेच्या अश्लील व्हिडिओबाबत एका अज्ञात व्यक्तीने सुद्धा कॅनाकोना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर चौकशी करून पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हरकती करण्याच्या आरोपात पूनम पांडेला अटक केली. मात्र, पूनम पांडे वादात सापडल्याचे हे काही नवीन प्रकरण नाही.

वाचा :- अर्णव गोस्वामीच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता

यापूर्वी तिने नुकतीच पती सॅम बॉम्बेविरोत पोलिसात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. प्रकरण नोंदवल्यानंतर काही दिवसांनी तिने व्हिडिओ शूट करून सांगितले की, आता सर्व ठीक आहे. तर कोरोना व्हायरसमुळे लावलेल्या लॉकडाऊनदरम्यान पूनम पांडे आणि सॅम बॉम्बेला लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पूनम पांडले नेहमीच सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि छायाचित्र टाकत असते.

वाचा :- राज्य सरकारची मोठी घोषणा; ऑनलाईन शाळांना सुट्टी जाहीर

वाचा :- अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

वाचा :- अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक