सिनेमा,मनोरंजन

उद्धव साहेबांनी, ‘किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल’

बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे हिम्मत दाखविली-राम गोपाळ वर्मा

5 Nov :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे हिम्मत दाखविली आहे. रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कारवाई केलीत हे पाहून मला समाधान वाटलं असे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी म्हटले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राम गोपाळ वर्मा यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की अर्णब गोस्वामीवरील कारवाई पाहून मला समाधान वाटले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखविली आहे. एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल आहे. वर्मा यांच्या टिट्‌वला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.कोणाची भिडभाड न ठेवता ते ट्‌विटही करीत असतात.

वाचा :- दिवाळीनंतर ‘लावणी’ आणि ‘तमाशा’ सुरू करू- मुख्यमंत्री

अर्णब गोस्वामी यांच्यावर रायगड पोलिसांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे. वर्मा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत.बाळासाहेबांकडे जे धाडस होते तसेच धाडस उद्धव ठाकरे यांच्याकडेही असल्याचे वर्मा यांना म्हणायचे आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अर्णब गोस्वामी यांनी बॉलिवूडमधील काही निर्माते, अभिनेत्यांनाही लक्ष्य केले होते.

वाचा :- दिवाळी साजरी कारण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘विशेष’ आवाहन

बॉलिवूडला गटार म्हंणणाऱ्या कंगना राणावतची बाजू घेत गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही एकेरी भाषेत उल्लेख करीत टीका केली होती. तसेच मुंबई पोलिसांवरही सातत्याने टीका करण्यात येत होती. अभिनेत्री कंगना राणावत हिने तर मुंबईला पीओक म्हटले होते त्यानंतर शिवसेना खवळली होती.

वाचा :- अर्णव गोस्वामीच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता

शिवसेनेनेही आपल्या शैलीत राणावत हिचा समाचार घेतला आहे. सुशांतप्रकरणानंतर ज्या पद्धतीचे राजकारण झाले. बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्याने नाराजी होती. आता अर्णब गोस्वामीवर कारवाई झाल्याने राम गोपाळ वर्मा यांनी समाधान व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले आहे.

वाचा :- अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

वाचा :- अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक