महाराष्ट्र

दिवाळीनंतर ‘लावणी’ आणि ‘तमाशा’ सुरू करू- मुख्यमंत्री

दिवाळीनंतर कलावंतांच्या आयुष्यातला अंधार संपणार

4 Nov :- Unlockची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळेच व्यवहार सुरू झाले आहेत. आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोककला असलेल्या तमाशालाही परवानगी द्यावी अशी मागणी आता करण्यात येतेय. फड मालकांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दिवाळीनंतर ‘लावणी’ आणि ‘तमाशा’ सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फड मालकांना दिलं आहे. गेले दहा महिने लावणी आणि तमाशा बंद आहे. त्यामुळे कलाकार आणि फड मालक आणि सगळ्यांचीच उपासमार होत आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली असं अखिल भारतीय लोकनाट्य मराठी तमाशा परिषदचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी सांगितलं.

वाचा :- अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

तमाशा आणि लावणी सुरू झाली तर आमच्या आयुष्यातला अंधार तरी संपेल. कलाकारांना दोन घास तरी मिळतील असंही जाधव यांनी सांगितलं. दिवाळीनंतर लावणी आणि तमाशा सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही जाधव यांनी दिली.

वाचा :- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार

तमाशा सुरू झाला तर त्यावर पोट असलेल्या शेकडो लोकांना आर्थिक आधार मिळेल असंही ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येत आहे. 5 नोव्हेंबरपासून सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे.

वाचा :- पोलिसांनी मला, कुटुंबातील सदस्यांना व मुलाला मारहाण केली- अर्णब

तसंच नाट्यगृहे देखील आता खुली होणार आहेत.सिनेमा हॉल सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. सामाजिक अंतर आणि शासनाकडून सांगण्यात आलेल्या इतर उपाययोजना करणं बंधनकारक असणार आहे.

वाचा :-अभिनेता फराज खानचं वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी निधन

वाचा :- अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक

वाचा :- कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टानं बजावली नोटीस