राजकारण

देवेंद्र फडणवीसांना भेटली कोरोनामुक्तीची पावती!

पुढचे 7 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला

4 Nov :- देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार सुरु होते. देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 7 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुप्रीटेंडेंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची 24 ऑक्टोबर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादन केले.

वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार

डिस्चार्ज मिळाल्यानंतर फडणवीसांनी ट्वीट करुन डॉक्टरांचे आभार मानले. आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज रुग्णालयातून घरी परतलो आहे.

वाचा :- पोलिसांनी मला, कुटुंबातील सदस्यांना व मुलाला मारहाण केली- अर्णब

सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद तसेच त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे. मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार!

वाचा :-अभिनेता फराज खानचं वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी निधन

वाचा :- अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

वाचा :- अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक