भारत

अर्णब गोस्वामीच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल

एफआयआर दाखल केली!

4 Nov :- ‘रिपब्लिक टीव्ही’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. 53 वर्षीय इंटिरियर डिझायनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अर्णब यांना ही अटक झाली आहे. आता मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध आणखी एक एफआयआर दाखल केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलिसांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा दावा गोस्वामी यांनी केला. मात्र अर्णब यांनीच महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पोलीस पथक जेव्हा अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी अर्णब गोस्वामी यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती.

वाचा :- पोलिसांनी मला, कुटुंबातील सदस्यांना व मुलाला मारहाण केली- अर्णब

अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

वाचा :- अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

वाचा :-अभिनेता फराज खानचं वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी निधन

वाचा :- अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक