अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या
हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही
4 Nov :- समाजात घडणाऱ्या संतापजनक घटनांमुळे माणसांच्या मानसिकतेची वाटचाल बधिरतेकडे होऊ लागली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जन्मलेल्या नवजात बालकास पाहून प्रत्येकास मायेचा पाझर फुटतो मात्र क्रूरपणाचा कळस ठरणारी आणि आणि माणसाच्या हृदयास हालवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
सांगलीतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील पाटील मळा येथे ही घटना घडली आहे. घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून ही हत्या करण्यात आली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार
माळवाडी -वसगडे रस्त्यालगत माळी यांचा शेतातील वस्तीवर साईदीप नावाचा बंगला आहे. सकाळी घरातील सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. त्यांची मुलगी ऐश्वर्या अमित माळी ही 13 दिवसाच्या बाळासोबत बेडरूममध्ये झोपली होती. तिची आई व वहिनी या दोघी शेतातील हौदावर धुणे धुत होत्या. ऐश्वर्या घराबाहेर असणाऱ्या बाथरूममध्ये गेली, त्यावेळी बेडरुम खाटेवर बाळ झोपलं होतं. मात्र ती परत घरातील बेडरूममध्ये आली, तेव्हा खाटेवरून बाळ गायब झाल्याचे लक्षात आले. बाळ सापडत नसल्याने तिने सर्वांना बोलावलं आणि हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर सर्व आल्यानंतर बाळाचा सगळीकडे शोध घेण्यात आला.
वाचा :- पोलिसांनी मला, कुटुंबातील सदस्यांना व मुलाला मारहाण केली- अर्णब
काही नागरिकांना शंका आली म्हणून बंगल्याच्या गच्चीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडले असता पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह तरंगत असल्याचा दिसून आला. याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली आहे. भिलवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
वाचा :-अभिनेता फराज खानचं वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी निधन
तासगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना तपास कामी योग्य त्या सूचना दिल्या. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोलिसांनी सर्व कुटुंबीय व शेजाऱ्यांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.
वाचा :- अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक
वाचा :- कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टानं बजावली नोटीस
वाचा :- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश