पोलिसांनी मला, कुटुंबातील सदस्यांना व मुलाला मारहाण केली- अर्णब
पोलिसांनी अर्णब गोस्वामीचे आरोप फेटाळून लावले
4 Nov :- रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आज रायगड पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. यावेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत अलिबाग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब यांच्यावर कारवाई केली आहे. आज कारवाई करते दोन पोलिसांकडून मारहाण झाली शिवाय कुटुंबातील सदस्यांना व मुलालाही मारहाण केली, असा आरोप अर्णब यांनी केला आहे.
वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार
अर्णब यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकढून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या हाताला व पाठीत देखील मारलं आहे, अशी माहिती अर्णब गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर यांनी दिली आहे. तसंच, अर्णब यांच्या अटकेबद्दलची माहिती पत्नीला देखील दिली गेली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा :- अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक
दरम्यान, पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यापासून सर्व घटनांचे चित्रीकरण केले आहे. अटकेची कारवाई करतेवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत, न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागितला आहे.
वाचा :- अभिनेता फराज खानचं वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी निधन
वाचा:- ठाकरे सरकारची बदनामी करण्यासाठी ट्वीटरवर दीड लाख अकाउंट उघडले!
वाचा :- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश