सिनेमा,मनोरंजन

अभिनेता फराज खानचं वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी निधन

अभिनेत्री पूजा भट्टनं दिली माहिती

4 Nov :- हिंदी चित्रपट सृष्टीत ९० च्या दशकाअखेर ‘फरेब’, ‘मेहंदी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारणारा भिनेता फराज खान मागील काही काळापासून प्रदीर्घ आजारपणाचा सामना करत होता. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी फराज खान याचं निधन झालं आहे. बंगळुरू येथूल एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अभिनेत्री पूजा भट्टनं त्यांच्या निधनाबाबतची माहिती दिली. यापूर्वी तिनं त्यांच्या आजारपणाचीही माहिती दिली होती. फराज यांनी अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यासह ‘मेहंदी’ या चित्रपटात भूमिका साकारली होती.

वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार

फराजच्या निधनाबाबत माहिती देत पूजानं ट्विटमध्ये लिहिलं, ‘अतिशय जड अंत:करणानं मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, फराज खान आपणा सर्वांना सोडून गेले आहेत. मी आशा करते की, आता ते एका चांगल्या विश्वात असतील. तुम्ही (त्यांच्यासाठी) जी मदत केली, त्यासाठी धन्यवाद. फराजला त्याच्या कुटुंबाची ससर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही मदत केली. त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. कारण फराजची जागा कोणीच घेऊ शकत नाही’.

वाचा:- ठाकरे सरकारची बदनामी करण्यासाठी ट्वीटरवर दीड लाख अकाउंट उघडले!

गेल्या काही दिवसांपासून फराज आजारपणाशी झुंज देत होता. त्याला आर्थिक मदतीसाठी म्हणून खुद्द पूजा भट्ट हिनं सर्वांनाच विनंती केली होती. सलमान खान यानंसुद्धा फराजच्या कुटुंबीयांना मदत देऊ केली होती.

वाचा:- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; लवकरच मिळणार दिवाळी सुट्टी

वाचा:- कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टानं बजावली नोटीस

वाचा:- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश