महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

भाजपची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका

4 Nov :- अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली. “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल,” अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा विरोध केला आहे.

वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार

अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन ते चार वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:- ठाकरे सरकारची बदनामी करण्यासाठी ट्वीटरवर दीड लाख अकाउंट उघडले!

अनिल देशमुख म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली.”

वाचा:- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; लवकरच मिळणार दिवाळी सुट्टी

वाचा:- कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टानं बजावली नोटीस

वाचा:- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश