महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार

नियम पाळणे बंधनकारक असणार!

4 Nov :- राज्यात एकूण 15 लाख 31 हजार 277 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 16 हजार 543 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.46 टक्के झाले आहे. राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत असताना राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मार्च महिन्यापासून बंद असलेले राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. यासंबंधीची एसओपी लवकरच जारी केली जाणार आहे. मात्र मल्टिप्लेक्स, नाट्यगृग, सिनेमागृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत.

वाचा:- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

राज्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांडूना सरावासाठी कंटेनमेंट झोनबाहेर स्विमिंग पूल उद्यापासून सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय कंटेनमेंट झोनबाहेर योगा इन्स्टिट्युटही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वाचा:- कोरोना योद्धा ; जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे दुःखद निधन

टेनिस, बडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारखे इनडोअर गेम साठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यासंबंधीच्या एसओपीही लवकरच जारी करण्यात येणार आहे.

वाचा:- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; लवकरच मिळणार दिवाळी सुट्टी

वाचा:- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश