Newsमहाराष्ट्र

कोरोना योद्धा ; जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे दुःखद निधन

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हा कारागृहाचे तुरुंग अधीक्षक संजय कांबळे (वय 38) यांचे दि. 03 नोव्हेंबर रोजी राञी लोटस हॉस्पिटल बीड येथे उपचारासाठी ॲडमिट केले गेले होते तेथेच त्यांचे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाला आहे मूळ राहणारे शेंबाळ पिंपरी जिल्हा यवतमाळ आसुन सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षणाच्या जोरावर ते या पदापर्यंत पोहोचले होते, एक तरुण सृजनशील, कर्तव्यदक्ष,मितभाषा, मनमिळावू स्वभावचे कारागृह अधीक्षक व अधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीतच बीड जिल्ह्यामध्ये एक वेगळी छाप निर्माण झाली होती, त्यांच्या अचानक जाण्याने समाज कार्यात खूप मोठी पोकळी निर्मण झाली आहे. त्याच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले आहेत कांबळे परिवाराला दुःखातुन सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच झुंजार नेता लाईव्ह तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.