राजकारण

ठाकरे सरकारची बदनामी करण्यासाठी ट्वीटरवर दीड लाख अकाउंट उघडले!

विदेशातून ऑपरेट झालीत ठाकरे सरकारची बदनामी करणारे अकाउंट्स’

3 Nov :- अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र शासन, मुंबई पोलीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी विशिष्ट हॅशटॅगद्वारे बोगस ट्वीटर अकाउंटवरून विशेष मोहीम चालविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. यासाठी ट्वीटरवर सुमारे दीड लाख अकाउंट्स उघडण्यात आली असून भारताप्रमाणेच चीन, नेपाळ, हाँगकाँगमधून लाखो ट्वीटस, रीट्वीट करण्यात आले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

विशेष म्हणजे एकाचे वेळी ५०० ट्विट करण्यासाठी बॉट (BOT) या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यापासून देश पातळीवर राजकारण तापले असतानाच सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात नकारात्मक ट्वीट आणि त्यापेक्षा अधिक रीट्वीट केले जाऊ लागले.

वाचा :- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; लवकरच मिळणार दिवाळी सुट्टी

यामध्ये काही षडयंत्र असल्याचा संशय आल्याने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला. या तपासामध्ये आतापर्यंत ट्वीटरवरील तब्बल दीड लाख अकाउंट बनावट असल्याचे उघड झाले आहे. एकावेळी ५०० ट्वीट आणि एका महिन्यात ५ लाख ट्वीट करण्यासाठी किंवा रीट्वीट करण्यासाठी BOT या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.

वाचा :- कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टानं बजावली नोटीस

एखादे विशिष्ट हॅशटॅग टाकून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नकारात्मक किंवा सकारात्मक कमेंट्स अपलोड करता येतात. एका वेळी ५०० ट्वीट केल्यामुळे आतापर्यंत अशा प्रकारचे कोट्यवधी ट्वीट आणि रीट्वीट केले गेले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

वाचा :- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

वाचा :- अमिताभ बच्चन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल!

वाचा :- ‘या’ कारणामुळे जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दाखल केली तक्रार