सिनेमा,मनोरंजन

कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टानं बजावली नोटीस

मद्रास हायकोर्टानं सेलिब्रिटींकडून मागितलं स्पष्टीकरण

3 Nov :- क्रिकेटर सौरव गांगुली विराट कोहली, अभिनेत्री तमन्ना भाटियाआणि अभिनेता राणा दग्गुबाती अडचणीत सापडले आहे. मोबाइल गेमिंग अँप्सची जाहिरात केल्यामुळे या सेलिब्रिटींना कोर्टानं नोटीस बजावली आहे. मद्रास हायकोर्टानं याप्रकरणी सेलिब्रिटींकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. गँबलिंग अँप्सला प्रोत्साहन दिल्याविरोधात मद्रास हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सेलिब्रिटींनी ऑनलाइन गँबलिंगला प्रमोट केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटर विराट कोहली, सौरव गांगुली, अभिनेता प्रकाश राज, तमन्ना भाटिया आणि राणा दग्गुबाती यांचा समावेश आहे. वृत्तानुसार या याचिकेवर आज मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठात ही सुनावणी झाली.

वाचा :- ‘या’ कारणामुळे जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दाखल केली तक्रार

मदुराई कोर्टानं सेलिब्रिटींना नोटीस बजावली आहे. हे मोबाइल अँप जुगाराला प्रोत्साहन देतं. लोकांवर गँबलिंग अँप्सचा आणि सेलिब्रिटींचा प्रभाव पडतो हे माहिती असताना त्यांनी अशा अँपचं प्रमोशन का केलं अशी विचारणा करण्यात आली आहे. या सेलिब्रिटींशिवाय कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारलादेखील उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

वाचा :- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान मद्रास हायकोर्टातच कोहली आणि तमन्नाविरोधात याच प्रकरणावरून आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोघांनाही अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाचा :- अमिताभ बच्चन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल!

वाचा :- आमिर खानच्या मुलीचे झाले लैगिंक अत्याचार

वाचा :- केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणू पाहत आहे