भारत

बियाणांबाबत कृषीमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली माहिती

2 Nov :- कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी 3 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी 62.69 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले की, राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अंत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी 3 लाख 13 हजार 586 क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे.

वाचा :- फडणवीसांच्या ‘या’ निर्णयांना ठाकरे सरकारने दाखवली केराची टोपली

सुधारीत तंत्रज्ञानावर आधारीत गहू 1830 हेक्टर, हरभरा 26821हेक्टर, मका (संकरीत) 293 हेक्टर, रब्बी ज्वारी 2460 हेक्टर, करडई 1510 हेक्टर, जवस 1050 हेक्टर, ऊस पिकामध्ये आंतरपीक हरभरा 2500 हेक्टर असे एकूण 36 हजार 464 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आलं आहे. रब्बी हंगामामध्ये नवीन विकसित केलेल्या सुधारीत-संकरीत वाणांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरीत करण्यात येते.

वाचा :- जाणून घ्या; गॅस सिलेंडरच्या नोव्हेंबर महिन्यातील किंमती!

10 वर्षाच्या आतील वाणांच्या बियाण्यासाठी गहू 2000 रुपये क्विंटल, हरभरा 2500 रुपये क्विंटल, मका (सं) 7500 रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी 3000 रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.

वाचा :- सरकार पाडून दाखवावे, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

वाचा :- नागरिकांनो, नोव्हेंबर महिन्यात ‘या’ तारखांना बंद राहणार बँका