अखेर सलमानने नेपोटीजमच्या मुद्द्यावर मौन सोडलं
बिग बॉसच्या शो मध्ये नाव न घेता मत व्यक्त केलं
1 Nov :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळण मिळाली आहेत. सुशांत प्रकरणानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटी.जमचा मुद्दा देखील चांगलाच जोर धरून आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावतनं तर जणू बॉलिवूड मधील नेपो.टीजम विरुद्ध बं.डच पुकारलं आहे. अशातच आता अभिनेता सलमान खान याने देखील नेपो.टीजमच्या मुद्द्यावर मौन सोडत आपलं मत व्यक्त केलं आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरात बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या नेपो.टीजमच्या मुद्द्यावरून वाद पाहायला मिळाला. बिग बॉस मधील स्पर्धक राहुल वैद्य याने कुमार सानू यांचा मुलगा जान सानू याला नेपो.टीजमवरून टोमणा मारला होता. राहुलने जानला स्वतःच्या मेहनतीवर नाव कमावण्याची गोष्ट देखील बोलून दाखवली. मग सलमान खानने विकेंडच्या भागात याच मुद्द्यावरून राहुल वैद्यला खडसावत नेपो.टीजमवर आपलं मत व्यक्त केलं.
वाचा :- खडसेंच्या गाडीचे टायर फुटून झाला अपघात
सलमान खान याने यावेळी राहुलला खूप सारे प्रश्न विचारले. कोणत्या बापाने आपल्या मुलाला केलेली मदत म्हणजे नेपो.टीजम आहे का? आपल्या पोटच्या मुलांसाठी दिवसरात्र कष्ट करणे नेपो.टीजम आहे का? असे सवाल सलमान खानने राहुलला विचारले. सलमान खानच्या या प्रश्नांवर काहीही न बोलता राहुल वैद्य शांत राहिला. सलमान खानने यानंतर रागात येऊन राहुल वैद्यला बॉलिवूड मधील अनेक उदाहरणे देणं सुरू केलं.
वाचा :- नागरिकांनो, नोव्हेंबर महिन्यात ‘या’ तारखांना बंद राहणार बँका
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तोच कलाकार टिकतो ज्याला लोक पसंत करतात. शाहरुख खान आणि अक्षय कुमार दोघेही आउटसाईडर आहेत. या दोघांचंही या इंडस्ट्री बरोबर काहीही कनेक्शन नव्हतं. मात्र, तरीही आज ते दोघे 20 ते 30 वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत टिकून आहेत, असं सलमान खानने यावेळी म्हटलं आहे. तसेच सलमान खानने यावेळी राहुल वैद्यला समजावताना काही स्टार किड्सची देखील उदाहरणे दिली आहेत. यावेळी त्याने राहुल वैद्यला अजय देवगण आणि संजय दत्त या दोन बड्या अभिनेत्यांची उदाहरणे दिली.
वाचा :- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा
वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार
‘या’ कारणामुळे आमिर खान विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार!