भारत

8 महिन्यांनंतर सरकारच्या तिजोरीत ‘इतक्या’ रुपयांचा महसूल जमा

1 Nov :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं कंबरडं मोडीत निघालं होतं. दिवसेंदिवस आरोग्यावरचा वाढत गेलेला खर्च आणि पूर्णतः आवक बंद झाल्याने सरकारची तिजोरी रिकामी झाली होती. केंद्राकडेच पैसे नसल्याने राज्यांच्या तिजोऱ्याही खाली झाल्या होत्या. त्यामुळे कर्मऱ्यांचे वेतन द्यायलाही सरकारकडे पैसे नव्हते.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कारखाने बंद राहिल्याने देशाचा विकासदर तळाशी गेला आहे. हे वर्ष असेच राहणार असून 2021 मध्ये देश पूर्वीचाच विकासदर गाठेल अशी आशा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केली होती. सरकारच्या तिजोरीत पैसेच नसल्याने केंद्र सरकार राज्यांनाही त्यांच्या वाट्याचे पैसे देऊ शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्रसह अनेक राज्यांनी केंद्राकडे पैशासाठी तगादा लावला आहे. महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे तब्बल 38 हजार कोटी रूपये बाकी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

कोरोनामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो आहे. सगळ्या विकास कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. तर नव्या योजना बंद झाल्या आहेत. मात्र गेल्या 8 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच सरकारच्या तिजोरीत 1 लाख कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. आता व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे.GSTचा महसूल हा थेट केंद्र सरकारकडे जमा होतो आणि नंतर तो राज्यांना मिळतो. आता गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापेक्षा या वर्षी 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाचा :- म्हणून राज्य सरकारवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

यावर्षी 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आता व्यवहार सुरू झाल्याने थोडी परिस्थिती सुधारली असून सरकारलाही दिलासा मिळाला आहे. कोरोनावर लस आली तरत्यावरही सरकारचा प्रचंड मोठा खर्च होणार आहे. लशीकरणावर तब्बल 80 हजार कोटींचा खर्च येणार असून त्याचा आरोखडा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे महसूल कसा वाढवायचा याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

वाचा :- नागरिकांनो, नोव्हेंबर महिन्यात ‘या’ तारखांना बंद राहणार बँका