बीड

केज- विवाहित महिलेचा गळा आवळून, दगडाने ठेचून केला खून

कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा शेतात मृतदेह आढळून आला

31 Oct :- तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला. महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

तालुक्यातील साळेगाव अश्विनी समाधान इंगळे (वय२८) ही महिला शुक्रवारी सकाळी आपल्या दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. याच सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचा गळ्यातील स्कार्फने गळा आवळून व दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली.

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

जीवे मारल्यानंतर प्रेत शेजारच्या कापसाच्या शेतात नेऊन टाकले होते. प्रेताजवळ दगड, स्कार्फ पडलेला असून प्रेतापासून काही अंतरावर वेचून ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायतील एक बूट तर दुसऱ्या बाजूस काही अंतरावर कानातील एक दागिना हेअर पिन असे पडलेले आहेत.

वाचा :- पंकजाताईंना शिवसेनेकडून ऑफर उद्धव ठाकरेच देऊ शकतात

महिलेचा खून झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेचे वडील सर्जेराव भीमराव सोनवणे (सारणी, ता.केज) यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने भावकीतील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

आरोपींना अटक करून केज पोलीस ठाण्यात आणण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सकाळी केज पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. मात्र घटना होऊन चोवीस तासांचा कालावधी उलटला तरी उच्चस्तरीय तपासणी होऊनही प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शनिवारी दुपारपर्यंत प्रेत उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. अशा प्रकारच्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना भविष्यात घडू नयेत. यासाठी या घटनेतील आरोपींना अटक करून लवकरात-लवकर कठोर शासन करण्याच्या मागणीचे निवेदन शनिवारी सकाळी मयत महिलेचे नातेवाइक, साळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.

वाचा :- पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वाचा :- उर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हातात घेण्यास राजी?