राजकारण

उद्धव ठाकरे कामे करत नाहीत म्हणून राज्यपालांकडे जाण्याची वेळ येते

प्रवीण दरेकर यांनी दिले प्रत्युत्तर

31 Oct :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावरुन आज वार्ताहरांना बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज ठाकरेंवर टीका केली आहे. त्याला आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामे करत नाहीत म्हणून सगळ्यांना राज्यपालांकडे जाण्याची वेळ येते,’ असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे लक्षात असुद्या. या भ्रमातून शिवसेनेने लवकर बाहेर पडले पाहिजे. या राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे.राज्यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारकडून मिळत नसेल म्हणून सर्व जण राज्यपालांकडे जात आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे याच भावनेतून राज्यपालांना भेटले, असे दरेकर म्हणाले. यापूर्वी देखील अनेक नेते राज्यपालांकडे आपले प्रश्न घेऊन गेले आहेत.

वाचा:-  पंकजाताईंना शिवसेनेकडून ऑफर उद्धव ठाकरेच देऊ शकतात

मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ न्याय देत नाहीत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी कामे केली असती तर राज ठाकरे यांच्यासारखा नेता आणि सामान्य नागरिकांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात वार्ताहरांना बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुद्धा शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणे योग्य नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना हाणला.

वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

अन्य विषय ठीक होते पण वीज बिलासाठी राज्यपालांकडे गेल्याचे याआधी ऐकले नाही. राजभवन ही राजकारणाची जागा नाही. आम्ही घटनात्मक पदाचा सन्मान करतो, असे म्हणत त्यांनी राज्यपालांना चिमटा काढला.

वाचा :- पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वाचा :- उर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हातात घेण्यास राजी?