राजकारण

उर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हातात घेण्यास राजी?

सुत्रांकडून मिळाली माहीती!

31 Oct :- विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागेसंदर्भात उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिल्याची माहिती समोर येत आहे. कालपासून उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषेदवर जाणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, उर्मिला काँग्रेस या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यामुळे ही शक्यता कितपत खरी ठरणार, याविषयी साशंकता होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हातात घेण्यास राजी झाल्याचे समजत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती.अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवत असल्याची चर्चा आहे.

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे निश्चित केली जातील. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवतील, अशी अटकळ बांधली जात आहे.मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. 

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

वाचा :- पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार