बीड

सुखद! बीडमधून 118 रुग्ण झाले कोरोनामुक्त

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट

30 Oct :- बीड जिल्ह्यात वेगाने धावणाऱ्या कोरोना गाडीचा वेग आता चांगलाच मंदावला आहे. आरोग्य विभागाने घेतलेल्या कठीण परिश्रमानंतर जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. तर कोरोना रुग्णवाढ सुद्धा घटू लागली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

नागरिकांनी कोरोनाची सौम्य लक्षण आढळताच तातडीने डॉक्टरांकडे जाणे अत्यावश्यक आहे. मात्र नागरिक स्वतः मेडिकलमध्ये जाऊन दैनंदिन औषध-गोळ्यांची खरेदी करून कोरोना संक्रमणास बढावा देत असल्याचा प्रकार समोर येत आहे. कोरोना रुग्णवाढ समाधानकारक घटत असली तरी कोरोना विषाणू नष्ट झालेला नाही म्हणून नागरिकांनी गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स ठेवत तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे.

वाचा :- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; दिवाळीनंतर ‘शाळा’ सुरू होणार!

बीड जिल्ह्यात कोरोना अंडर कंट्रोल येऊ लागला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यांमधून तब्बल 118 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती भेटली आहे. आजपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकूण 13 हजार 281 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर आजपर्यंत 417 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या बीड जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट 11 .03% एवढा आहे. आणि रिकव्हरी रेट 89.05% एवढा आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता खबरदारी घ्यावी. आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा.

वाचा :-  पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा