महाराष्ट्र

ठाकरे सरकारकडून माजी सैनिकांना दिवाळी भेट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला

30 Oct :- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात माजी सैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार आता माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घरपट्टी व मालमत्ता कर भरावा लागणार नाही.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ मार्च, २०२० रोजी विधानसभेत जाहीर केला होता. याच निर्णयाच्या अंमलबजावणीला आज समंती देण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना लाभ होणार आहे.

वाचा :- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; दिवाळीनंतर ‘शाळा’ सुरू होणार!

राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता.
मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार.

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

अध्यादेश काढण्यास मान्यता.शिवभोजन थाळीचा दर दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० पासून पुढील सहा महिन्यांसाठी पाच रुपये करण्यास मान्यता.मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द. नव्याने निविदा मागविणार.

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

वाचा :- पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार