महाराष्ट्र

संतापजनक! नवजात बाळाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न

शेतकऱ्याने वाचवले बाळाचे प्राण

29 Oct :- माणुसकीला कलंकित करणाऱ्या घटना घडू लागल्याने समाजाची वाटचाल बधिरतेकडे होऊ लागली आहे असे म्हनालयाला हरकत नाही. पुण्यात नवजात बाळाला जिवंत जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी नवजात बाळाला अर्धे जमिनीत पुरले होते, पण तेथे जवळच असलेल्या शेतकऱ्याने आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाचे प्राण वाचवले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

यादरम्यान शेतकऱ्याने आरोपींना पकडले होते, पण पोलिस येण्यापूर्वी आरोपींना पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, घटना पुण्यातील पुरंदरजवळील अंबोडी परिसरातील आहे. प्रकाश पांडुरंग नावाच्या शेतकऱ्याने सांगितले की, दोन आरोपी एका नवजात बाळाला जमिनीत पुरण्याचा प्रयत्न करत होते. बाळाचा आवाज ऐकून मी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत आरोपींनी बाळाला अर्धे जमिनीत पुरले होते. थोडा उशीर झाला असता, तर बाळाचा जीव गेला असता.

वाचा :- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; दिवाळीनंतर ‘शाळा’ सुरू होणार!

सासवड पोलिस स्टेशनचे अधीक्षक डीएस हाके यांनी सांगितले की, आम्हाला फोन आल्यावर आम्ही एक पथक घटनास्थळी पाठवले. अद्याप बाळाची ओळख पटलेली नाही. आम्ही येण्यापूर्वी आरोपींना तेथून पळ काढला. सध्या आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. सध्या नवजात बाळाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक आहे.

वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

वाचा:-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

वाचा :- 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकाचा पर्दाफाश