“भारतीय बाजार हे गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण बनेल”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला दावा
29 Oct :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं कंबरडे मोडल्या गेले. मात्र कोरोना संक्रमणाची योग्य दक्षता घेत देशात हळूहळू सर्व काही सुरु करण्यात आले आहे. यामुळेच देशाची आर्थिक व्यवस्था पुन्हा चांगल्या पद्धतीने सुधारल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला आहे की, “देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. अलीकडच्या सुधरणावादी निर्णयांमुळे जगाला संकेत मिळाले आहेत की नवा भारत बाजाराच्या ताकदींवर विश्वास ठेवतो,” “भारतीय बाजार हे गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण बनेल,” असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
वाचा :- शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; दिवाळीनंतर ‘शाळा’ सुरू होणार!
इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेसह कोरोना लस, कृषी क्षेत्र अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोनाव्हायरसविरुद्धची सरकारची लढाई, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर जोर दिला.
वाचा :- व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार
“चीनचं नाव न घेता त्यांनी म्हटलं की, कोरोनाव्हायरसच्या महामारीनंतर जगभरात भारत उत्पादन आणि पुरवठ्याच्या व्यवस्थेत अग्रगण्य देशांमध्ये सहभागी होईल. इतर देशांना झालेल्या नुकसानीचा फायदा घेणं यावर भारताचा विश्वास नाही. परंतु भारत आपल्या लोकशाही, लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पुरवठ्यातून हे स्थान मिळवेल,” असं मोदी म्हणाले.
वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा
वाचा :- 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकाचा पर्दाफाश