महाराष्ट्र

शिक्षणमंत्र्यांनी दिली नवी माहिती; दिवाळीनंतर ‘शाळा’ सुरू होणार!

टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार

29 Oct :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा आलेख आता घसरणीला लागला असल्याचे सुखदायी चित्र समोर येऊ लागले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून योग्य दक्षता घेत राज्यात हळहळू सर्व काही सुरु करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईनवर सुरु असलेल्या शाळा प्रत्यक्षात कधी सुरु होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करताना अधिक विचार करण्याची गरज आहे.

वाचा :-  शाळांचे दरवाजे उघडणार; राज्य सरकारने काढला आदेश!

दुसरीकडे त्यानंतरचे इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू होतील. विषेश म्हणजे सरसकट शाळा सुरू करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याच्यादृष्टीने हे आवश्यक आहे. राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सुचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.

वाचा :-  व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

वाचा :-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

वाचा :-  200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकाचा पर्दाफाश