देश विदेश

कोरोना आटोक्यात येत असताना ‘या’ नव्या आजाराचं थैमान सुरु

या आजाराची लक्षण- रक्तात गुठळ्या होणे, ताप येणे

29 Oct :- गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात सुरु असलेलं कोरोना विषाणूचे थैमान मानवी आयुष्य विस्कळीत करून आता कुठेतरी आटोक्यात येत असल्याचे सुखदायी चित्र दिसू लागले आहे. कोरोनाच्याच्या या संकटातून कसाबसा स्वतःला सावरून माणूस बाहेर निघू लागला आहे तोवरच आता आणखी एका नव्या आजाराने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अमेरिकेतील शास्त्रज्ञांना अभ्यासादरम्यान एका आनुवंशिक आजाराबाबात माहिती मिळाली आहे. वेक्सास असं या आजाराचं नाव. या आजारामुळे आधीच कित्येकांचा मृत्यू झाला आहे आणि आता काही रुग्ण दिसून आले आहेत. विशेष म्हणजे या आजाराचा सर्वात जास्त धोका पुरुषांनाच आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांना काही रुग्णांच्या रक्तात गुठळ्या झाल्याचं, त्यांना ताप येत असल्याचं आणि त्यांच्या फुप्फुसात समस्या झाल्याची लक्षणं दिसून आली. मात्र यामागे नेमकं कारण आहे ते समजत नव्हतं.

वाचा :-  शाळांचे दरवाजे उघडणार; राज्य सरकारने काढला आदेश!

नॅशनल ह्युमन जिनोम रिसर्च इन्स्टिट्युटचे (NHGRI) क्लिनिकल फेलो डॉ. डेव्हिड बी. बेर म्हणाले, NIH क्लिनिकल सेंटरमध्ये असे रुग्ण आले होते, ज्यांना सूजेची समस्या होती. मात्र त्याचं कारण माहिती नव्हतं. त्यांच्यावर उपचार करणं शक्य नव्हतं. 2,500 रुग्ण लक्षात घेत या आजारावर लक्षणांनुसार उपचार न करात वेगळ्या पद्धतीने उपचार करण्याचं ठरलं. लक्षणांनुसार उपचार करण्याऐवजी जिन्सचा अभ्यास केला. यूबीए1 जीनमध्ये बदलांमुळे हा आनुवंशिक आजार होत असल्याचं संशोधकांना दिसून आलं. या आजाराला त्यांनी vacuoles, E1 enzyme, X-linked, autoinflammatory and somatic syndrome (VEXAS syndrome) असं म्हटलं.

वाचा :-  व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

शास्त्रज्ञांच्या मते, वेक्सास सिंड्रोम बहुतेक पुरुषांमध्येच दिसून आला आहे कारण हा एक्स गुणसूत्राशी (X chromosome) संबंधित आहे. पुरुषांमध्ये हा गुणसूत्र फक्त एक असतो तर महिलांमध्ये अतिरिक्त एक्स गुणसूत्र असतो. त्यामुळे या दुसऱ्या गुणसूत्रामुळे महिलांचा बचाव होतो. त्यांना या आजाराचा धोका कमी आहे, तर पुरुषांना जास्त आहे. या आजारामुळे आधीच 40 टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही जर्नलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

वाचा :-  माझ्यावर बलात्कार झाला असता- अमिषा पटेल

वाचा :-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा