सिनेमा,मनोरंजन

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदललं!

निर्मात्यांनी होत असलेला विरोधामुळे नाव बदललं

29 Oct :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमारचा नवा चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी होत असलेला विरोध पाहता चित्रपटाच्या नावातच बदल केला आहे. अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर अनेकांनी याच्या नावावर टीका केली होती.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अखेर चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदललं आहे. आता या चित्रपटाच्या नावातील बॉम्ब हा शब्द हटविण्यात आला आहे. आता चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असेल. लक्ष्मी चित्रपटा 9 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. राघव लॉरेंस द्वारा निर्देशित हा चित्रपट गुरुवारी सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी पाठविण्यात आला होता.

वाचा :-  व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असनाऱ्या तरुणीवर बलात्कार

स्क्रीनिंगनंतर चित्रपट निर्माते आणि CBFC यांच्यामध्ये चित्रपटाबाबत चर्चा झाली.लोकांच्या भावनांचा आदर करीत चित्रपटाचे निर्माते शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनीही आपल्या सोशल मीडियावरुन लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाला दिलेल्या नावावर टीका केली आहे. लक्ष्मी बॉम्ब अशा नावाचे चित्रपट प्रदर्शित होऊ नये, या नावात बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

वाचा :-  शाळांचे दरवाजे उघडणार; राज्य सरकारने काढला आदेश!

वाचा :-  प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

वाचा :-  माझ्यावर बलात्कार झाला असता- अमिषा पटेल