सौदी अरेबियाने भारताला दिली ‘ही’ दिवाळी भेट
दिवाळी भेट असा उल्लेख त्यांनीच केला
भारताशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या सौदी अरेबियाने दिवाळी भेट दिली आहे. नव्या नोटेवर जगाचा नकाशा छापण्यात आला असून त्यात पाकने आपल्या हद्दीत दाखविलेले पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि गिलगीट-बाल्टीस्तान वगळण्यात आले. पीओकेमधील कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी केलेल्या ट्विटमुळे हे स्पष्ट झाले.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
दिवाळी भेट असा उल्लेख त्यांनीच केला आहे. याचा संदर्भ असा की, “जी20′ समुहाचे नेतृत्व सौदी अरेबियाकडे आहे. 21 व 22 नोव्हेंबर रोजी या समुहाची परिषद होणार आहे. त्यानिमित्त सौदी अरेबियाने 20 रियालची (सौदी चलन) विशेष नोट छापून तिचे अनावरण केले. त्यात पाकिस्तानच्या नकाशात वरील दोन भागांचा समावेश नाही. सौदी अरेबियाची ही कृती पाकिस्तान तसेच पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी कलंक आहे, अशी प्रतिक्रियाही मिर्झा यांनी व्यक्त केली.
वाचा:- माझ्यावर बलात्कार झाला असता- अमिषा पटेल
इम्रान यांच्या सरकारने गिलगीट-बाल्टीस्तानमध्ये 15 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोजित केली आहे. यास भारताने तीव्र विरोध दर्शविला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख व गिलगीट-बाल्टीस्तान हा आपला अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र खात्याने केला आहे.दरम्यान, महिला पत्रकार व कार्यकर्त्या नायला इनायत यांनी यासंदर्भात इम्रान यांना टोला लगावला.
वाचा:- मोठी बातमी! पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचा धोका
सौदी अरेबियाचे युवराज महंमद बीन सलमान गेल्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. त्यावेळी इम्रान यांनी स्वतः मोटार चालवून त्यांना आपल्या अधिकृत निवासस्थानी आणले होते. त्याचा संदर्भ देत नायला यांनी ट्विट केले की, इम्रान हे महंमद बीन सलमान यांच्यासाठी ड्रायव्हर बनल्याची ही अशी फळे मिळाली आहेत.
वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा