महाराष्ट्र

राज्यात 14 लाख 86 हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरणीला

28 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचे महाकाय थैमान गेल्या काही दिवसांमध्ये शमल्या जात असल्याचे सुखदायी चित्र समोर येऊ लागले आहे. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात येत असले तरी कोरोना विषाणू नष्ट झालेला नाही त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्स मेंटेन करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घसरणीला लागलेला कोरोना रुग्णांचा आलेख कायम आहे. बुधवारी राज्यात 8 हजार 430 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 86 हजारांवर गेली आहे. त्यामुळे राज्याचा Recovery Rate हा 89.53 एवढा झाला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दिवसभरात 6 हजार 738 रुग्णांची भर पडली तर 91 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.62 एवढा झाला आहे. तर राज्यात सध्या उपचार घेण्याऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 28 हजारापर्यंत खाली आली आहे. सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटदेखील 90.62 वर गेला आहे. देशातील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक असली तरी महाराष्ट्राचा धोका मात्र पुन्हा वाढला आहे.

वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

सणासुदींच्या काळात महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत केंद्र सरकारने सावध केलं आहे आणि कोरोनाशी लढण्याची रणनीती बदलण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात 5 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.

वाचा:- पवारांनीही केले पंकजाताईंचे कौतुक

वाचा:- मोठी बातमी! पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचा धोका