राजकारण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण

स्मृती इराणी यांनी ट्विटरवरून दिली माहिती

28 Oct :- देशात कोरोना विषाणूचा कहर काहीसा आटोक्यात येत असताना गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातल्या आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जे माझ्या संपर्कात आले त्या सगळ्यांनीही टेस्ट करून घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या आधीही केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक मंत्री उपचारानंतर पुन्हा कामालाही लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

वाचा:- मोठी बातमी! पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचा धोका

सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटदेखील 90.62 वर गेला आहे. देशातील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक असली तरी महाराष्ट्राचा धोका मात्र पुन्हा वाढला आहे. सणासुदींच्या काळात महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत केंद्र सरकारने सावध केलं आहे आणि कोरोनाशी लढण्याची रणनीती बदलण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.

वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात 5 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.

वाचा:- पवारांनीही केले पंकजाताईंचे कौतुक

वाचा:- घरपोहच गॅस सिलेंडर्स मिळणाऱ्या प्रक्रियेत होणार मोठा बदल