मोठी बातमी! पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचा धोका
गुरपतवंत सिंह पन्नू यांनी ही हल्ल्याची योजना तयार केली
28 Oct :- बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उतरले आहेत. त्यांच्या काही सभाही तिथे होत आहेत. याच सभांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. बंदी असलेल्या खालिस्तानी दहशतवाद्यांची संस्था ‘जस्टिस फॉर शिख’ चे प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू यांनी ही हल्ल्याची योजना तयार केली आहे. या कटाची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पंतप्रधानांच्या सभेत घातपात घडवून सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. त्याची माहिती मिळाल्याने हा कट उधळला गेला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्था असलेल्या IBने बिहार पोलिसांना याची माहिती दिली असून सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. या आधी 2013मध्ये पाटण्यात नरेंद्र मोदी यांची गांधी मैदानावर सभा झाली होती. त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या सभेत स्फोट घडविण्यात आले होते.
वाचा:- पवारांनीही केले पंकजाताईंचे कौतुक
मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आलं होतं त्यानंतर ते देशभर सभा घेत होते. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला मतदान झालं तर दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील.
वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा
दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.
वाचा:- घरपोहच गॅस सिलेंडर्स मिळणाऱ्या प्रक्रियेत होणार मोठा बदल