राजकारण

पवारांनीही केले पंकजाताईंचे कौतुक

राज्यात राजकीय भूकंप!

28 Oct :- भाजपमधून एकनाथ खडसे नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेलेत. खडसे हे भाजपमध्ये नाराज होते. विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे याही नाराज होत्या. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी पंकजा मुंडे या ऊसतोडणी कामगारांच्या बैठकीला उपस्थित होत्या. त्या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. त्यानंतर रात्री उशीरा पंकजा मुंडे यांनी ट्विट करत पवारांचं कौतुक केलं होतं.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या वयातही पवार ज्या झपाट्याने काम करता हे कौतुकास्पद आहे असं पंकजाताईंनी म्हटलं होतं. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं कौतुक करून 24 तास होत नाहीत तोच पवारांनीही पंकजा मुंडे यांचं कौतुक केलं आहे. पंकजा या चांगलं काम करत आहेत असं पवारांनी नाशिक मध्ये म्हटलं आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा:- प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा

त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांचं कौतुक करत महाराष्ट्राची संस्कृतीच असल्याचं म्हटलं होतं. दोन्ही नेत्यांच्या या कौतुक वर्षावामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे.पंकजा मुंडे यांची नाराजी अजुनही गेली नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी केलेली पवारांची स्तुती आणि नंतर पवारांनी केलेलं कौतुक हे लक्षवेधी ठरलं आहे. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केलेलं भाषण हेही आक्रमक होतं.

वाचा:- घरपोहच गॅस सिलेंडर्स मिळणाऱ्या प्रक्रियेत होणार मोठा बदल

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं राजकीय सख्य सगळ्यांनाच माहित आहे. अनेक दिवसानंतर हे दोनही नेते मंगळवारी पुण्यात एकाच कार्यक्रमात सोबत होत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात मंगळवारी बैठक झाली होती. त्या बैठकीत पंकजा आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. त्या दोघांचीही बसण्याची व्यवस्था ही शेजारीच केलेली होती आणि त्यांच्यात गप्पाही रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या सगळ्या राजकारणाकडे पाहिलं जात आहे.

वाचा:- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा!

वाचा:- धक्कादायक! दीपिकाच्या मॅनेजरच्या घरात सापडले ड्रग्ज