प्रतीक्षा संपली! पूनावालांनी केला लसीबाबद मोठा खुलासा
लशीच्या 100 दशलक्ष डोसांची पहिली तुकडी उपलब्ध होईल
28 Oct :- देशामध्ये कोरोना विषाणूचा कहर सध्या आटोक्यात येत असला तरी कोरोना विषाणूची दहशद मात्र नागरिकांच्या मनावर कायम आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण मानवी आयुष्य विस्कळीत करून सोडले आहे. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी जगभरात प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती प्रशासनाने अनेकदा दिली आहे. परंतु नक्की लस येणार कधी ही उत्सुकता प्रत्येक नागरिकांना लागलेली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
कोरोनावायरसच्या लशीबाबत पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण बाब स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, ते म्हणाले की एसआयआय निर्मित ऑक्सफर्ड कोरोनाव्हायरस लशीच्या 100 दशलक्ष डोसची पहिली तुकडी 2021 च्या दुसर्या किंवा तिसर्या तिमाहीत उपलब्ध होईल. ऑक्सफर्डची कोरोना लस अत्यंत किफायतशीर होईल, असेही पूनावाला म्हणाले. पूनावाला म्हणाले, “आम्ही पहिल्यांदा 100 दशलक्ष डोस देण्याच्या उद्दिष्टावर काम करत आहोत. ते 2021 च्या Q2-Q3 पर्यंत उपलब्ध होईल.
वाचा:- गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त
” पूनावाला म्हणाले, “जर यूकेने आगाऊ चाचणी सुरू केली असेल आणि त्यांनी आमच्यासोबत आकडेवारी शेअर केली तर आपत्कालीन चाचण्यांसाठी आम्ही आरोग्य मंत्रालयाला अर्ज करू आणि तेथून ते मंजूर झाल्यास आम्हीसुद्धा हीच चाचणी भारतात करू शकू.
वाचा:- घरपोहच गॅस सिलेंडर्स मिळणाऱ्या प्रक्रियेत होणार मोठा बदल
” जर हे सर्व यशस्वी झालं तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत आमच्याकडे ही लस उपलब्ध असेल. ” पूनावाला म्हणाले की, पुढचे आव्हान हे आहे, ज्याचा आपण सामना करावा लागणार आहे. या ट्विटच्या दुसर्याच दिवशी त्यांनी कोविड -19 लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लशीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.