भारत

घरपोहच गॅस सिलेंडर्स मिळणाऱ्या प्रक्रियेत होणार मोठा बदल

चोरी रोखण्यास मिळणार मदत

27 Oct :- रोजच्या वापरातील आणि जीवनावश्यक असणारे गॅस सिलेंडर्सच्या होम डिलिव्हरीच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 1 नोव्हेंबर पासून देशात LPG सिलेंडरशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या दिवसापासून गॅस सिलेंडर्सच्या होम डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. असे सांगण्यात येत आहे की हे नवे नियम बदलल्यामुळे गॅस सिलेंडरची चोरी रोखण्यास आणि ग्राहकांना ओळखण्यास मदत मिळेल. आता आपल्याला फक्त गॅस बुकिंग करून ताबडतोब गॅस डिलिव्हर होणार नाही. तर या साठी आपल्या नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर वर एक कोड पाठविण्यात येईल. हा कोड आपल्याला डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला सांगावा लागेल. त्या नंतरच आपल्याला गॅस सिलेंडर मिळेल.

वाचा :-  पंकजाताईंनी दिले धनंजय मुंडेंना जोरदार उत्तर

या साठी आपला मोबाईल नंबर गॅस कंपनी कडे नोंदवणे आवश्यक आहे.हे अ‍ॅप डिलिव्हरी करणाऱ्या मुलाकडे देखील असणार. या साठी आपल्याला आपला मोबाईल नंबर अपडेट करावा लागणार त्या नंतरच कोड देखील जनरेट केला जाणार.

वाचा :- अनलॉक -5 साठी गाईडलाईन्स जारी; जाणून घ्या नवे नियम

वाचा :-  ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा!