फ्रँड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे घेऊन येतायत ‘तार’
पोस्टमनच्या मुख्य भूमिकेत दिसणार
27 Oct :- मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अल्पवधीतच सहज आणि साध्यापनाने स्वतःचे अधिराज्य निर्माण करणारे फ्रँड्री, सैराटसारखे हिट सिनेमा देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच आपली नवी कलाकृती प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. ‘तार’ असं त्यांच्या आगामी शॉर्ट फिल्मचं नाव आहे. विशेष म्हणजे ‘तार’मध्ये ते पडद्यामागे नाही तर पडद्यावर झळकणार आहेत. या शॉर्टफिल्ममध्ये ते पोस्टमनच्या मुख्य भूमिकेत असतील. या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन पंकज सोनावणे करणार आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
स्वत: नागराज मंजुळेंनी फेसबुकवरुन नव्या प्रोजेक्टची माहिती दिली. तार या शॉर्टफिल्ममध्ये नागराजसोबत भुषण मंजुळे, भुषण हंबे, विवेक जांबळे, पूजा डोळस या नामांकित कलाकारांनीही चित्रपटात काम केलं आहे. नागराज मंजुळेंच्या फँड्री आणि सैराट चित्रपटांमध्ये हे कलाकार झळकले होते.नागराज मंजुळे हे मराठीतले गाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांना त्यांच्या उत्तम कलाकृतीसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
वाचा :- पंकजाताईंनी दिले धनंजय मुंडेंना जोरदार उत्तर
नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले होते. सैराट सिनेमातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाचं लेखन, संवाद अतिशय उत्तम दर्जाचे होते. सैराटचं संगीत आजही चाहत्यांच्या तोंडावर आहे. सैराटचा हिंदीतही रिमेक झाला होता. नाळ, फ्रँड्री, हायवे असे उत्तम चित्रपट नागराज मंजुळेंनी साकारले आहेत. नागराज यांनी ‘कोण होईल मराठी करोडपती’ या शोचं सूत्रसंचालनही केलं होतं. नेहमीच काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स करुन दाखवणाऱ्या या दिग्दर्शक आणि अभिनेत्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.