सिनेमा,मनोरंजन

धक्कादायक! दीपिकाच्या मॅनेजरच्या घरात सापडले ड्रग्ज

आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

27 Oct :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज अँगलच्या तपासात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीच ड्रग्ज सापडले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करण्यात आली होती.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

रिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत करिश्मा त्यांच्या सातत्याने संपर्कात होती, असं उघड झालं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तिच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तिच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. तिला चौकशीसाठी पुन्हा समन्स पाठवण्यात आला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितलं, “करिश्मा प्रकाशला समन्स बजावलं आहे. तिला उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे. सध्या तपास सुरू असून, आताच सविस्तर माहिती देऊ शकत नाही” मात्र करिश्मा प्रकाश सध्या गायब आहे. तिच्याशी संपर्क होत नसल्याचं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

वाचा :- अनलॉक -5 साठी गाईडलाईन्स जारी; जाणून घ्या नवे नियम

याआधी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या तपासात दीपिका आणि करिश्माचे 2017 सालचं ड्रग्जसंबंधी चॅट समोर आलं होतं. या चॅटमध्ये तिनं आपली मॅनेजर करिश्माकडे ‘माल’ आहे का अशी विचारणा केली होती. त्यानंतर या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती. शिवाय दीपिका आणि करिश्मा या दोघींना समोरासमोरही आणून त्यांची चौकशी झाली. दीपिका सध्या गोव्यात शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव येताच दीपिकाला शूटिंग अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं होतं.

वाचा :- पाकिस्तानमध्ये झाला मोठा बॉम्बस्पोट!

दीपिकाची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. मी सुद्धा या चॅटचा एक भाग आहे हे दीपिकाने कबूल केलं होतं. या चौकशीनंतर दीपिकाचा फोनही जप्त करण्यात आला होता. चौकशीनंतर दीपिका पुन्हा गोव्याला गेली. शकुन बत्रा यांच्या फिल्ममध्ये दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचीसुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे.आता दीपिकाच्या मॅनेजरच्या घरात ड्रग्ज सापडल्यानंतर या प्रकरणात आता आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

वाचा :- गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

वाचा :- तिरंग्याचा अवमान करत मुफ्तीने दिले केंद्राला पुन्हा आव्हान