भारत

गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

27 Oct :- सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली आहे. हे सर्व दिवस हे नवरात्रातले होते. त्यामुळे या काळात संख्या घसरणीला लागणे ही दिलासादायक बाब मानली जाते.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

देशाचा रिकव्हरी रेट हा 90.62वर गेला आहे. देशातल्या उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण हे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ आणि तेलंगानाचा समावेश आहे.

वाचा :- अनलॉक -5 साठी गाईडलाईन्स जारी; जाणून घ्या नवे नियम

महाराष्ट्रात 21.52 टक्के, केरल 15, कर्नाटक 12.05, पश्चिम बंगाल 5.94 तमिलनाडू 4.68, आंध्र प्रदेश 4.60, उत्तर प्रदेश 4.26, दिल्ली 4.12, छत्तीसगढ 3.53 तेलंगाना 2.86 टक्के एवढ्या रुग्णांचा समावेश आहे.गेल्या 24 तासांमध्ये 58 टक्के मृत्यू हे 5 राज्यांमध्ये झाले आहेत. त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटकचा समावेश आहे. या आधी 1 लाख रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी 57 दिवस लागत होते आता 13 दिवसांमध्ये 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

वाचा :- पाकिस्तानमध्ये झाला मोठा बॉम्बस्पोट!

23 ते 29 स्पटेंबरच्या दरम्यान रोज सरासरी 83,232 नवे रुग्ण सापडत होते. 21 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान ही संख्या 49,909 हजारांवर गेली अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19चे 49.4 टक्के रुग्ण हे केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीतून आले आहेत. भारतातला कोविड-19 चा रिकव्हरी रेट सप्टेंबर महिन्यात 76.94 होता तो आता 90.62 टक्क्यांवर गेला आहे. भारतात कोविडचा मृत्यूदर हा 1 सप्टेंबरला 1.77 होता तो आता 1.50 टक्के एवढा झाला आहे.

वाचा :- तिरंग्याचा अवमान करत मुफ्तीने दिले केंद्राला पुन्हा आव्हान