राजकारण

नवनीत राणा यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला

बाहेरूनच देवीची ओटी भरत पूजा केली

२४ Oct :- खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याला अंबादेवी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांसह दोन किलोमीटर अनवाणी पायी चालत अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवीकडे पोहोचले असता त्यांना मंदिरात आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आतमध्ये दर्शनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याला प्रवेश दिला गेला नाही. राणा दाम्पत्याने मंदिराबाहेर राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत बाहेरून देवीची ओटी भरत पूजा केली, राणा दाम्पत्य हे दरवर्षी दोन किलोमीटर अनवाणी पायी अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्त्यांसह राणा दाम्पत्य मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना बाहेरच अडवण्यात आले, त्यामुळे त्यांनी बाहेरूनच अंबादेवीचं दर्शन घेतले. मात्र त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली तर राज्यातील दारूची दुकान सुरू आहेत, मंदिर मात्र बंद आहेत, त्यामुळे मंदिर सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती केल्यास मुख्याद्यापकांवर होणार कारवाई

नवरात्रोत्सवात सर्वत्र उत्साह, धामधूम पाहायला मिळतोय. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होतोय. भाविकांविना मंदिरे सुनसान झाली आहेत. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन परत जात आहेत. मंदिर प्रवेशास परवानगी नाकारल्यानं किरकोळ व्यावसायिकांचही नुकसान होत आहे. मंदिराजवळ मंडप टाकून तयार केलेल्या छोट्याशा दुकानात पूजेच साहित्य, चिवडा विकून अनेक जण आपला उदरनिर्वाह करतात.मंदिरात दैनंदिन पूजा, आरती होत असतात. नवरात्रोत्सवात दररोज शेकडो भाविकांची गर्दी राहायची. तिथं आता अपवादाने भाविक येतात. मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेत भाविक परतात.

पंकजाताईंनी शिवसेना प्रवेशा बाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण

यंदा इथले महाप्रसाद, कोजागिरी उत्सव असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सगळं काही अनलॉक होत असताना मंदिर मात्र अद्यापही उघडण्यास परवानगी नाही. त्यामुळे मंदिराबाहेर दुकान लावून उदरनिर्वाह करणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिरे कधी उघडणार, किरकोळ विक्रेत्यांना रोजगार कसा मिळणार, असे प्रश्न विचारले जात आहेत.

वाचा :- म्हणून 20 वर्षापर्यंत कोरोना लसीची गरज

वाचा :- ‘या’ प्रकारे साजरा होणार शिवसेनेचा ‘ऑनलाईन’ दसरा मेळावा