पंकजाताई मुंडे भाजप सोडणार नाहीत!
विनायम मेटे यांनी व्यक्त केला विश्वास
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
25 Oct :- एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर पंकजा मुंडेदेखील पक्ष सोडतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशात पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायम मेटे यांनी व्यक्त केला आहे.
वाचा :- एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया- मुख्यमंत्री
खरंतर खडसेंप्रमाणे, पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. पण यावर पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
वाचा :- शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती केल्यास मुख्याद्यापकांवर होणार कारवाई
म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या. धिक्कार केला, काहीही बोलल्या, त्यांच्या कार्यक्रमाला नाही गेल्या. वाईट कमेंट केल्या, तरी हे सगळं फक्त भाजप सहन करतो. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही.’ असं विधान विनायक मेटे यांनी केलं आहे.तर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेशा देण्यात शरद पवार बिझी असल्यामुळे त्यांना मराठा आरक्षणकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल असं म्हणत विनायक मेटे यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.
वाचा :- पंकजाताईंनी शिवसेना प्रवेशा बाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण
मराठा आरक्षण प्रकरणी आघाडी सरकारने समाजाला सैरभैर केलं आहे. बैठकीत सरळ-सरळ चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरणी काही घडलं तर त्याला फक्त अशोक चव्हाण जबाबदार असतील. अशोक चव्हाण हे फक्त खुर्ची उबवण्याचं काम करत आहेत, अशी गंभीर टीकाही यावेळी मेटेंनी केली.
वाचा :- म्हणून 20 वर्षापर्यंत कोरोना लसीची गरज
वाचा :- ‘या’ प्रकारे साजरा होणार शिवसेनेचा ‘ऑनलाईन’ दसरा मेळावा