देश विदेश

चीनकडून कोरियामध्ये धडकणार पिवळ्या धुळीचे वादळ

धोका लक्षात घेत किम जोंग उनने काढले आदेश

25Oct :- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान उत्तर कोरियामध्ये आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. कोरियामध्ये चीनकडून पिवळ्या धुळीचे वादळ धडकणार आहे. उत्तर कोरियाच्या प्रशासनाने या वादळामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच कोरोना संसर्गाचा हा धोका लक्षात घेता नागरिकांना घरातच दारं खिडक्या बंद करून राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

उत्तर कोरियाने कोरोनाने एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा केला आहे. एनके न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी प्योंगयांगच्या रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे नागरिकांनी किम जोंग उनने दिलेल्या सूचनांचे, आदेशाचे पालन केले असल्याचं दिसून आलं आहे. उत्तर कोरियाचे सरकारी वृत्तपत्र रोडोंग सिन्मूनने दिलेल्या वृत्तानुसार, या ‘यलो डस्ट’मध्ये मानवी शरीराला अपायकारक घटक आहेत. या घटकांमुळे श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो.

वाचा :- पंकजाताईंनी शिवसेना प्रवेशा बाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण

जगभरात कोरोनाचा हवेतून होत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.कोरोना धुळी”चे वादळ, किम जोंग उनने दिला “हा” आदेश कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याशिवाय घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ही पिवळी धूळ घरात येऊ नये यासाठी दारे खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा :-  शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती केल्यास मुख्याद्यापकांवर होणार कारवाई

रशियन कोरोनाचा संसर्ग हवेतून पसरत नसल्याचं सीडीसीने स्पष्ट केलं आहे. हवेतून कोरोनाचा संसर्ग काही अंतरापर्यंतच फैलावू शकतो, असेही याआधी अनेक संशोधकांनी म्हटलं आहे. मात्र उत्तर कोरियात आवश्यक काळजी घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वाचा :- पंकजाताईंनी केले ऊसतोड कामगारांना ‘हे’ आवाहन

वाचा :- म्हणून 20 वर्षापर्यंत कोरोना लसीची गरज