बीड

पंकजाताईंनी शिवसेना प्रवेशा बाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण

निर्णय घेण्यास मी खंबीर आहे- पंकजाताई

24 Oct :- एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर मिळाली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याबाबत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी शिवसेनेत जाणार का ? का आणखी कुठे जाणार ? अशा अफवा पसरवत माझ्याबद्दलची भविष्यवाणी काहीजण विनाकारण करत आहेत. मात्र, पक्षाने मला भरपूर दिले असून निर्णय घेण्यास मी खंबीर आहे, असे म्हणत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला. त्या अंबाजोगाई येथे बोलत होत्या.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अंबाजोगाईत आमदार नमिता मुंदडा यांच्यावतीने शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्या जाहिर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.या सत्कारादरम्यान पंकजा मुंडे यांनी अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला. पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच कळत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार की आणखी कुठे जाणार अशा अफवा पसरवितात.

वाचा :- ‘या’ प्रकारे साजरा होणार शिवसेनेचा ‘ऑनलाईन’ दसरा मेळावा

माझ्या भविष्याची चिंता करून नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय, तसेच गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे माझी चिता सोडा, असा शब्दात पंकजा मुंडे यांना अफवा पसरविणाऱ्यांचा खरपूस समाचर घेतला. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोना कालावधित मी मुंबईत अडकून पडले.

वाचा :- पंकजाताईंनी केले ऊसतोड कामगारांना ‘हे’ आवाहन

मी जर घराबाहेर पडले असते तर, माझ्याभोवती लोकांनी गर्दी केली असती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून मी घराबाहेर पडले नाही. मात्र, काही जणांनी याचा गैरअर्थ घेऊन पंकजा मुंडे घराबाहेर पडत नाहीत अशा अफवा पसरविल्या. कोरोना काळात एकही सत्ताधारी कोविड रूग्णालयांकडे फिरकला नाही. अशा परिस्थितीत खा. डाॅ. प्रीतम मुंडे आणि अक्षय मुंदडा यांनी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. रूग्णांना दिलासा दिला.

वाचा :- फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल!

वाचा :- म्हणून 20 वर्षापर्यंत कोरोना लसीची गरज