पुन्हा कंगनाची जीभ घसरली; ठाकरेंवर साधला निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वडिलांची तत्त्वे विसरले आहेत
24 Oct :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनोट हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शनिवारी सकाळी एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वडिलांची तत्त्वे विसरले आहेत. रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या मुद्यावरुन पत्रकारांवर अत्याचार करणा-या अशा सरकारचा धिक्कार असो, असे कंगना म्हणाली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यापासून ती गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट सरकार, बीएमसी, मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे.अभिनेत्री कंगना रनोट हिच्याविरोधात मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे.याकाळात तिने मुंबई पोलिस आणि धर्मावरुन आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल मुंबईतील वकील अली काशिफ खान यांनी अंधेरी काेर्टात तिच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे.
वाचा :- ‘या’ प्रकारे साजरा होणार शिवसेनेचा ‘ऑनलाईन’ दसरा मेळावा
कंगनाने वांद्रे मॅजिस्ट्रेट काेर्टाकडून तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या आदेशानंतर साेशल मीडियावर न्यायपालिकेविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे खान यांनी मुंबईच्या अंधेरी काेर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. कंगनावर देशद्राेह आणि समाजात द्वेष पसरवण्याचाही आरोप करत त्यांनी ती सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचे सांगितले.
वाचा :- फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल!
कंगना समाज, कायदा, तपास यंत्रणा व न्यायपालिकेची थट्टा करत आहे, असे खान म्हणाले आहेत. काेर्ट या प्रकरणात 10 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे. वांद्रे कोर्टाच्या आदेशावरून मुंबई पोलिसांनी कंगनावर गुन्हा दाखल केला. तिला 26-27 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
वाचा :- म्हणून 20 वर्षापर्यंत कोरोना लसीची गरज
वाचा :- शरीर संबंधासाठी पतीच्या मित्रांना नकार दिल्याने विवाहितेस मारहाण!