बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज 77 नवे रुग्ण पॉझिटिव्ह!!

रुग्णवाढ आली आटोक्यात

24 Oct :- बीड जिल्ह्यात वेगाने धावणाऱ्या कोरोनाच्या गाडीचा वेग सध्या चांगलाच मंदावला आहे. रोज रुग्णवाढ समाधानकारक घटत आहे. रुग्णवाढ जरी आटोक्यात येत असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. नवरात्र, दसरा, ईद, दिवाळी अशी मोठंमोठी सण काही दिवसांवरच आली आहेत. त्यामुळे नागरिक खरीदीकरीता बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा, मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

तोंडावर मास्क नसताना, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. म्हणूनच सध्या आटोक्यात येत असलेला कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या घसरणीचा वेग कायम आहे. सलग काही दिवसांपासून संख्या घटत असून त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. लोकांना कठोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहनही प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

वाचा :- फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल!

जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमना पासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.माझी कुटुंब माझी जबाबदारी या योजने प्रमाणे प्रत्येकाने कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे. आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 2094 अहवाला पैकी 77 नवे रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- म्हणून 20 वर्षापर्यंत कोरोना लसीची गरज